“सह्याद्रि’च्या वतीने स्व. पी. डी. पाटील यांना अभिवादन

मसूर – सह्याद्रि साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या 11 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सर्व अधिकारी, कर्मचारी व सभासद यांनी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या जीवन कार्याची महती विषद केली. आणि त्यांनी कराड आणि परिसरासह सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीवेळी दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांची माहिती उपस्थितांना दिली.
आबासाहेब पाटील म्हणाले, कारखाना ऊसाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी साहेबांनी संबंधित गावच्या शेतकरी सभासदांच्या सहकार्याने कार्यक्षेत्रातून बारमाही वाहणाऱ्या कृष्णा व कोयना या नद्यांवर लहान-मोठ्या 32 सहकारी उपसासिंचन योजनांची उभारणी केली. आजही त्या योजना उत्तमप्रकारे कार्यरत आहेत हे कौतकास्पद आहे, असे ते म्हणाले. तसेच आदरणीय पी. डी. पाटील साहेबांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार सर्वांनी कामकाज करणे हीच साहेबांना आदरांजली ठरेल, असेही पाटील म्हणाले.

याप्रसंगी फायनान्सियल ऍडव्हायझर एच. टी. देसाई, जनरल मॅनेजर, पी. आर. यादव, चीफ केमिस्ट जी. पी. करांडे, चीफ अकौन्टंट जी. व्ही. पिसाळ, सिव्हील इंजिनिअर वाय. जे. खंडागळे, सिव्हील इंजिनिअर उदय पाटील, कामगार व कल्याण अधिकारी एन. आर. जाधव, परचेस ऑफिसर जे. डी. घार्गे, इरिगेशन इंजिनिअर डब्ल्यु. एल. साळुंखे, शेती अधिकारी मोहनराव पाटील, ई. डी. पी मॅनेजर पी. एस. सोनवणे, ऊस विकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण, डेप्यु. सिव्हील इंजिनिअर प्रताप चव्हाण, पर्यावरण इंजिनिअर एच. जे. माने, डिस्टीलरी इनचार्ज डी. जे. जाधव, स्टोअर सुपरीटेंडंट डी. एन. पिसाळ, डेप्यु. चीफ अकौन्टंट संजय पाटील, डेप्यु. ऊस विकास अधिकारी एस. जी. चव्हाण, इरिगेशन संपर्क प्रमुख आर. जी. तांबे, सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य शिवाजीराव बच्चे, जनसंपर्क अधिकारी व्ही. जे. शेलार, वाहन विभागप्रमुख मोहन पिसाळ, सुरक्षा अधिकारी एस. बी. नाईगडे यांचेसह सर्व विभागप्रमुख, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने आदरांजली कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.