सलाम..! ‘या’ सेलिब्रेटींनी दिला कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात

मुंबई – देशासमोर उभ्या असलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, वरूण धवन, सनी देओल, अजय देवगण, कार्तिक आर्यन, नाना पाटेकर यांनी करोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या लढ्यासाठी मैदानात उतरले असून, अनेकांनी सरकारला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.

दरम्यान, कलाकारांचा हा सहभाग बघता देशाचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांनी या बॉलिवूड स्टार्सचे भरभरून कौतुक देखील केले आहे.

पंतप्रधान मोदींनी मदतीचं आवाहन केल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने 25 लाख रुपये दान केले आहेत.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 25 लाखांची मदत करत सर्वांना जमेल तशी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

उरी फेम अभिनेता विकी कौशलनं PM Cares फंड आणि महाराष्ट्र सीएम रिलीज फंडमध्ये 1 कोटी रुपये दान केले आहेत.

अभिनेता कार्तिक आर्यन सुरुवातीपासूनच कोरोनाशी लढ्यात सक्रिय आहे. त्यानं PM Cares फंडमध्ये 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.

क्रिकेटर रोहित शर्मानं कोरोनाग्रस्तांसाठी 80 लाखांची मदत केली आहे.

अभिनेता वरुण धवननं कोरोनाग्रस्तांसाठी 55 लाखांची मदत केली आहे.

साउथ अभिनेता अलू अर्जुननं कोरोनाग्रस्तांसाठी 1.5 कोटींची मदत केली आहे.

साउथ सुपरस्टार प्रभासनं PM Cares फंडसाठी 4 कोटींची मदत केली आहे. याशिवाय प्रत्येकी 50-50 लाख आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा सीएम फंडमध्ये दान केले आहेत.

कॉमेडियन कपिल शर्मानंही 50 लाखांची मदत केली आहे.

साउथ सुपरस्टार महेशबाबूनं PM Cares फंडमध्ये 1 कोटी रुपये दान केले आहेत.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं PM Cares फंडमध्ये 10 लाख रुपये दान केले आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांनी PM Cares फंडमध्ये 21 लाखांची मदत केली.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.