वढू बुद्रुक : येथील गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधास्थळी पोलीस बंदोबस्त आहे. 1 जानेवारी 2018 रोजी सकाळी कोरेगाव भीमा परिसरातील विजयस्तंभांच्या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त असतो. त्याचदरम्यान वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथील दोन समाजांमध्ये झालेला तेढ व त्यानंतर कोरेगाव भीमा व परिसरात दि. 1 व 2 जानेवारी 2018 रोजी उसळलेल्या दंगलीमध्ये जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना तैनात करावे लागले.
त्यावेळी कोरेगाव भीमा, सणसवाडी, वढु बुद्रुक, पेरणे, शिक्रापूर, चौफुला येथे तणावपूर्ण वातावरण असल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दि. 5 जानेवारी 2018 पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला होता. त्यावेळेपासून दि. 30 डिसेंबर 2018 रोजी सुरू झालेला पुणे ग्रामीण पोलीसांच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या ग्रुप नंबर दोनचे जवान बंदोबस्तात तैनात आहेत.
दि. 15 डिसेंबर 2019 नंतरही हा बंदोबस्त दोन वर्षे कायमच राहिला आहे. अद्यापही परिसराला छावणीचे स्वरूप कायम आहे. दोन वर्षे ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता कोरेगाव भीमा परिसर शांत करण्याचे काम पोलिसांनी चोख पार पाडले आहे.