बॅंकेतून बोलतोय सांगून महिलेची फसवणूक

1 लाख 24 हजार रुपयांना घातला गंडा

मंचर- वसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील एका महिलेच्या एटीएमची माहिती घेऊन एका अज्ञात भामट्याने बॅंकेतून बोलतोय असे सांगून 1 लाख 24 हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केली आहे. अवसरी खुर्द येथील सोनाली पांडुंरग राजगुरु (वय 23) यांचे मंचर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र या शाखेत खाते आहे. बॅंकेतून बोलतोय तुमचे एटीएम बंद पडले आहे, ते चालू करायचे आहे.

ते चालू करण्यासाठी तुमचा एटीएम नंबर व इतर माहिती घेत तिच्या खात्यावरुन प्रथम 24 हजार 999 रुपये काढून घेतले. नंतर 25 हजार रुपये, पुन्हा 25 हजार रुपये असे थोड्या-थोड्या वेळाने पैसे काढले. पैसे काढल्याचे लक्षात येताच सोनाली राजगुरु यांनी बॅंकेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन खात्यातून परस्पर पैसे कोणीतरी काढल्याचे निदर्शनास आणून दिले.त्यानंतर खाते लॉक केले. व्यवस्थापक यांनी तुमच्या खात्यावरील उर्वरित रक्कम काढून घ्या, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी सोनाली राजगुरु या बॅंकेत उर्वरित रक्कम काढण्यासाठी गेल्या असता.

लॉक केलेले खाते खोलल्यानंत पुन्हा खात्यावरुन पेटीएमद्वारे डेबिट कार्डाच्या ओटीपीच्या माध्यमातून 50 हजार रुपयाची रक्कम काढून घेतली असल्याचे दिसून आले. यामधून एकूण 1 लाख 24 हजार 999 रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीने काढून घेतली. याबाबत सोनाली पांडुरंग राजगुरु यांनी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलीस
करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.