पाबळ (प्रतिनिधी) : पाबळ येथील पद्ममणी जैन तीर्थपेढी व दानशूर जैन भाविक श्रीमती प्रेम धनराजजी डांगी यांचे संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन करण्यात आलेल्या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला, यावेळी तब्बल तीनशे रुग्णांची डोळे तपासणी करण्यात आली असून शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
तब्बल नव्वद वर्षे वय असलेल्या श्रीमती प्रेम डांगी यांचे हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले,यावेळी जैन ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई नागोरी, विश्वस्त राजेंद्र शहा,सतीश गांधी,जयेश शहा, हर्षद गांधी, केतन शहा,डांगी परिवार व ग्रामस्थ व ठुसें रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान जैन ट्रस्टच्या माध्यमातून यापूर्वी दहा हजार रुग्णाच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी योगदान दिले असून मध्यतरी दोन वर्षांच्या कालावधीत ही सुविधा बंद केली होती. त्यामुळे गोरगरीब रुग्ण आर्थिक परिस्थितीअभावी या शस्त्रक्रियेसाठी वंचित राहिले होते, आता पुन्हा एकदा या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने ग्रामस्थांतून स्वागत केले जात आहे.