अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच या चित्रपटाविषयी अनेक चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या निमित्ताने दीपिकाने ऍसिड हल्ल्याबाबत केलेली जनजागृती किंवा चित्रपटाच्या कथेवरून निर्माण झालेला वाद असे अनेक विषय पुढे आले आहेत.
नुकतंच दीपिकाने ‘छपाक’ चित्रपटाला अनुसरून सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला. यामध्ये शूटिंग दरम्यान सेट वरील मजा दीपिकाने शेअर केली आहे.