नवी दिल्ली : गेल्या 2 महिन्यांमध्ये केंद्र सरकारने सिलिंडरच्य दरात वाढ केली होती. तेल विपणन कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. मात्र, होळी आधी सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून 53 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याचबरोबर 19 किलो वजनाचा विना अनुदानित सिलिंडरही 84.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आतापर्यंत 858.50 रुपयांना उपलब्ध होणारा सिलिंडर आता 805.50 रुपयात उपलब्ध होईल.
नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत सुमारे दीडशे रुपयांनी वाढ झाली होती. सर्व महानगरांमध्ये अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 144.50 रुपयांवरून 149 रुपयांवर आणली गेली, जी 12 फेब्रुवारीपासून लागू झाली होती.