नागपूर – मागील काही दिवसांपासून नागपूरमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याआधीही नागपूर गुन्हेगारीची राजधानी झाल्याचे आरोप होत होते. त्यातच आता एका नातवानेच आपल्या आजीचा खून केल्याचं समोर आलं आहे. चार गर्लफ्रेंडच्या नादात नातवाने आपल्या आजीला संपवल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.
काही दिवसांपूर्वीच नागपूरमधील नंदनवन या ठिकाणी एका वृद्ध महिलेचा खून झाला होता. खुर्चीला बांधून महिलेचा गळा कापण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.
दरम्यान पोलिस तपासात नातवानेच आजीला ठार केल्याचं स्पष्ट झालं. आपल्या तीन- चार गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करता यावी म्हणून नातू नितेश पाचभाई याने आजीला संपवलं.
तीन-चार गर्लफ्रेंडच्या संपर्कात आसलेल्या मितेशला मौजमजा करण्यासाठी पैशांची गरज होती. मात्र आजीमुळे ते मिळत नव्हते. यावरून आरोपी मितेशला आपल्या आजीचा राग येत होता.
मितेशचे आई-वडील डॉक्टर आहेत. ते सकाळीच रुग्णालयात निघून जात असत. त्यामुळे घरी आजी देवकाबाई बोबडे आणि नातू मितेश दोघेच असायचे. मितेश आपल्या वेगवेगळ्या गर्लफ्रेंडला अभ्यासाच्या बहाण्याने दररोज घरी घेऊन यायचा. मात्र आजी कडक स्वभावाची असल्याने त्या मुलींची विचारपूस करायच्या. आजी वारंवार मितेशच्या रुममध्ये जावून शहानिशा करायच्या. तसेच मुलींवर पाळत ठेवत होत्या. यावरून मितेश आणि आजीचा वाद व्हायचा.
दरम्यान खर्चासाठी पैसे मिळावे आणि आजीचा अडसर दूर व्हावा या उद्देशाने मितेशने आपल्या आजीचा खून केल्याचं तपासात समोर आलं आहे.