नवी दिल्ली – भाजपचे माजी खासदार आणि अभिनेते ‘परेश रावल’ यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींवर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. “फुकटच्या बंगल्यात राहून नातीनं आजीचं नाक कापल”. अशी टीका परेश रावल यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. परेश राव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.
मुफ़्त के बंगले में रहेकर पोती ने दादी की नाक कटवा दी !
— Paresh Rawal (@SirPareshRawal) July 2, 2020
प्रियंका गांधी यांना महिनाभरात सरकारी बंगला सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढच्या महिनाभरात म्हणजेच 1 ऑगस्टपर्यंत त्यांना हा बंगला सोडायचा आहे. त्या 3.46 लाख रुपयांचं देणं असल्याचंही सरकारी नोटिशीत म्हटलं आहे. अश्यात आता परेश रावल यांनी देखील प्रियांका गांधींवर निशाणा साधला आहे.
नोटिशीत म्हटलं कि, ” प्रियंका गांधी यांनी लोधी इस्टेट रोडवरचा बंगला क्रमांक 35 पुढच्या महिनाभरात रिकामा करावा. 1997 मध्ये त्यांना हा बंगला देण्यात आला होता. मात्र आता त्यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सिक्युरिटी देण्यात येत नाही. त्यामुळे त्यांना या बंगल्यात राहता येणार नाही.