चिंबळी -मरकळ (ता. खेड) येथील श्री हनुमान, भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्ताने रविवार (दि. 25) ते मंगळवार (दि. 27) पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांसह बैलगाडा शर्यत व कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे भैरवनाथ महाराज यात्रा कमिट व ग्रामस्थानी सांगितले. दरम्यान, या बैलगाडा शर्यतीमध्ये 540 बैल गाडा शौकीकांनी सहभाग घेतला आहे.
मरकळ येथे रविवारी सकाळी मंदिरात सकाळी 8 ते 10 श्रींची महापूजा व छबीना, मांडव-टहाळे मिरवणूक व अभिषेक आयोजित करून सकाळी 7 वाजल्यापासून बैलगाडा शर्यती रंगणार आहे. तर सोमवारी (दि. 26) सकाळी 8 वाजता बैलगाडा शर्यती होणार आहे तर रात्री 9 वाजता करमणुकीसाठी रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 27) सकाळी 9 वाजता तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे,
त्यानंतर दुपारी 4 वाजता कुस्ती जंगी कुस्तीचा आखाडा ठेवण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, राजाराम लोखंडे, माजी सभापती विलास कातोरे, माजी सरपंच अनिल लोखंडे, सरपंच अमोल लोखंडे, उपसरपंच नयना वर्पे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील लोखंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी युवा उद्योजक सागर लोखंडे, संतोष भुसे, सुनील लोखंडे, निखील माळी, नामदेव घेनंद, आनंद मुद्दा, सुनिल वर्पे उपस्थित राहणार आहेत.