पुणे : शहरावर आलेल्या करोनाच्या संकटाशी झुंज देतानाच ; लॉकडाऊन मुळे रस्त्यावरील बेघर आणि गावी जाताना वाटेत अडकलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आलेल्या नागरिकांना निवास आणि जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच निवाऱ्या मध्ये असऱ्याला असलेल्या एका गर्भवती महिलेने शुक्रवारी मुलीस जन्म दिला आहे. ही मुलगी आणि आई सुखरूप आहे. बीड येथील ही महिला आहे.
महापालिकेने शहरात लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या बेघरांना पालिकेच्या शाळेत निवासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून अशाच प्रकारची सुविधा महात्मा फुले शाळेत करण्यात आली होती. त्यानंतर या क्षेत्रीय कार्यालयाचे पथक अशा नागरिकांना शोधत असताना 4 दिवसांपूर्वी त्यांना पुणे स्टेशन बसस्थानक परिसरात बीड जिल्ह्यातील शिरसदेवी गावातील रणाबाई अडगळे या 9 महिन्याच्या गर्भाती पतीसह रस्त्याच्या कडेला राहत असलेल्या दिसून आल्या या पथकाने तात्काळ रणाबाई यांना महात्मा फुले शाळेत राहण्यासाठी जागा देत , त्याची तिथेच आरोग्य तपासणी केली.
त्यानंतर, शुक्रवारी सायंकाळी त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीनं पालिकेच्या कमला नेहरु रुग्णालायत हलविण्यात आले. तर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रणाबाई यांनी मुलीला जन्म दिला. दरम्यान, आई आणि मुलगी सुखरूप असून रणाबाई यांचे पती त्यांच्या सोबत असून या दांपत्याची सर्व सुविधा पालिकेच्या वतीने करण्यात आले असल्याचे ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यकायचे महापालिका सहायक आयुक्त दयानंद सोनकांबळे यांनी सांगितले. तर, अशा अडचणीच्या काळात महापालिकेकडून मिळालेले सहकार्य आणि घेण्यात आलेल्या काळजी बाबत या दाम्पत्यांनी पालिकेचे आभार मानले आहेत.