सोरतापवाडी -उरुळी कांचन येथील एक राजकीय महिलेचा काल (मंगळवारी) खासगी लॅबमधील पॉझिटिव्ह आलेला अहवाल आज सरकारी लॅबमधून निगेटिव्ह आला आहे. यामुळे या महिलेला दिलासा मिळाला असला तरी खासगी लॅबबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान या महिलेच्या संपर्कातील चौदा जणांचे स्वॅब घेऊन पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठविले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली. या महिला पदाधिकाऱ्यास त्रास होऊ लागला म्हणून कदमवाकवस्ती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
तेथे करोनाची स्वॅब तपासणी करून पुणे येथील शासकीय प्रयोग शाळेत पाठविले होते. तेथील रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला. तर आज सरकारी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तरीदेखील ही महिला राहत असलेला परिसर खबरदारीसाठभ सील केला आहे. नातेवाईक व संपर्कात आलेल्या चौदा लोकांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे.