सरकार जवानांच्या कुटूंबाची काळजी घेण्यास कटिबद्ध: गृहमंत्री

नवी दिल्ली : केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा रविवारीम्हणाले  की, मोदी सरकार देशाचे रक्षण करणाऱ्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या सैनिकांच्या कुटूंबाची काळजी घेण्यास कटिबद्ध आहे.

प्रत्येक अर्धसैनिक बल जवानांना  किमान 100 दिवस त्यांच्या कुटूंबियांसमवेत राहता येण्यासाठी सरकार काम करीत असल्याचे ते म्हणाले. शहा सीआरपीएफ मुख्यालयाच्या पायाभरणी समारंभात जवानांना संबोधित करीत होते.

ते म्हणाले निमलष्करी दलाच्या जवानांच्या कुटुंबांना आरोग्य कार्डची सुविधा दिली जाईल. सीआरपीएफचे तीन लाखाहून अधिक सैनिक आहेत. सैन्य नक्षलविरोधी कारवायांचा मुख्य आधार आहे.

2022 पर्यंत नवीन इमारत बांधण्याचे काम सीपीडब्ल्यूडीला देण्यात आले आहे. सध्याचे सीआरपीएफचे मुख्यालय लोधी रोडवरील केंद्र सरकारच्या कार्यालयात (सीजीओ) परिसरातील आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.