रांची : झारखंड मुक्ति मोर्चाचे (जेएमएम) नेते हेमंत सोरेन यांच्या सरकारची शपथग्रहण होण्यापूर्वी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला आहे. बंदी घातलेल्या माकप सीपीआय माओवाद्यांनी खुंटी येथील आर्की पोलिस स्टेशन अंतर्गत सेल्दा येथील सामुदायिक इमारत स्फोटकांनी उडवून दिली.
या घटनेनंतर एसडीपीओ आशिषकुमार महाली कुमार यांच्या नेतृत्वात पोलिस दलाने घटनेची माहिती घेतली. घटनेसंदर्भात महाली म्हणाले की प्राथमिक तपासणीनुसार या घटनेत नक्षलवाद्यांनी हात असल्याचे दिसत आहे.
सरकारी इमारतीमध्ये पोलीस शिबीर घेऊ नये असे पोस्टर नक्सवाद्यांतर्फे लावण्यात आले होते. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी या इमारतीत पोलिस भवनाची निर्मिती करण्यात आली होती.