सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात बुधवारी (दि. 9) रात्री जाहीर करण्यात आलेल्या 1547 चाचण्यांच्या अहवालांनुसार आणखी 114 नागरिक करोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गुरुवारी दिली.
चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट) 7.11 टक्के एवढे कमी आहे. त्याचबरोबर करोनाबळींची संख्या घटली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेले काही दिवस सातत्याने 94 टक्क्यांच्या वर आहे. ही दिलासादायक बाब असली तरी करोनाबळी पूर्णपणे रोखण्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन अजूनही अपयशी ठरत आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात सदरबझार, गोडोली प्रत्येकी दोन, शनिवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, मल्हार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र 11, कोडोली, देगाव, वळसे, शिवथर, भरतगावाडी, सोनगाव (माहुली), पाडळी प्रत्येकी एक,
कराड तालुक्यामध्ये कराड शहर, उंब्रज प्रत्येकी दोन, शनिवार पेठ, गजानन हौसिंग सोसायटी, तांबवे, शेरे, आटके, ओंड प्रत्येकी एक, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी प्रत्येकी एक,
फलटण तालुक्यात कोळकी पाच, साखरवाडी, वाखरी प्रत्येकी दोन, विडणी, होळ, राजाळे, आसू, डोंबाळवाडी, कांबळेश्वर, चौधरवाडी, वडजल, निंबळक, जाधववाडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज 2, पुसेगाव, निढळ, बोंबाळे, औंध प्रत्येकी एक,
माण तालुक्यात म्हसवड नऊ, बनगरवाडी दोन, बोडके, रांजणी, कुळकजाई, पिंगळी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात एकसळ दोन, जांब बुद्रुक, रहिमतपूर, नाळेवाडी, शिरंबे, जळगाव, जरेवाडी, अनपटवाडी प्रत्येकी एक,
जावळी तालुक्यात कुडाळ तीन, करंडी, भोगवली प्रत्येकी एक, वाई तालुक्यामध्ये वाई शहरात गणपती आळी, सोनगीरवाडी प्रत्येकी एक, इतरत्र दोन, कणूर, चिंधवली प्रत्येकी एक,
खंडाळा तालुक्यात लोणंद नऊ, सुखेड, बावडा प्रत्येकी एक, इतर पाच, बाहेरील जिल्ह्यांमध्ये सांगली, ठाणे प्रत्येकी एक, असे एकूण 114 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या 53 हजार 193 झाली आहे.