पुणे – ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर आता हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा आणि कोकणाच्या काही भागात पाऊस होईल असे सांगण्यात आले आहे. आज गुरुवार (दि. 31) ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. शेततील पीकं डोळ्यासमोर जळताना पाहून शेतकही हतबल झाला आहे. दुसरीकडे येत्या काही दिवसांत जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्थाही कठीण होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात चारा छावण्या सुरू करण्याचीही मागणी होत आहे. तर विरोधी पक्षाचे नेते राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत.
31 Aug,Rainfall anomaly forecast by IMD for coming 4 weeks in sept, indicates possibility of good revival of rainfall staring frm mid 1st week of Sept to Mid Sept over parts of South Peninsula, Central India including Maharashtra (Marathwada), Konkan, Goa, Karnataka, Kerala coast pic.twitter.com/Luv77XaV6V
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 31, 2023
हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस राहू शकतो, असे संकेत दिले आहेत. सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरमध्ये मध्यापर्यंत चांगला पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.
ऑगस्ट महिन्यात राज्यात 58 टक्के सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्यातील पाऊस सरासरीपेक्षा 70 ते 86 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. पण एकाही जिल्ह्याची पावसाची सरासरी 50 टक्क्यांपेक्षा जास्त नाही. ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यातील कोरडवाहू जमीनितील सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान होत आहे. ऐन हातातोंडाशी येत असलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे. पण आता सप्टेंबर महिन्यात पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान विभाने दिला आहे. अंदाजानुसार पाऊस झाला तर पिकांना मोठा आधार मिळणार आहे.
31 ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येणार्या 4 आठवड्यांसाठी IMD च्या पावसाच|अंदाज:सप्टेंबरच्या 1ल्या आठवड्याच्या मध्ये ते सप्टेंबरच्या मध्य; दक्षिण द्वीपकल्प, महाराष्ट्र (मराठवाडा), कोकण, गोवा यासह मध्य भारतातील काही भागांत पावसाच्या चांगल्या पुनरुज्जीवनाची शक्यता.कर्नाटक,केरळ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 31, 2023