वॉशिंग्टन – तरुणपणामध्ये सर्व दैनंदिन गरजा समोर उभ्या असताना आपल्याला लॉटरी लागावी आणि जॅकपॉटच्या माध्यमातून मोठी रक्कम हाती लागावी असे सर्वांचे स्वप्न असते लॉटरी लागल्यानंतर ते पैसे कसे खर्च करायचे याचे नियोजनही तरुण पिढीने तयार केलेले असते पण जेव्हा वयाची शंभरी पार केलेल्या एखाद्या व्यक्तीला जॅकपॉट लागतो तेव्हा मात्र हे पैसे कसे खर्च करायचे याबाबत प्रश्न निर्माण होतो अमेरिकेतील एका 106 वर्षे वयाच्या आजीबाईंना जुगारामधून मोठी रक्कम मिळाली आहे.
पण वयाच्या या अवस्थेमध्ये एवढी मोठी रक्कम कशी खर्च करायची या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळत नाही डेली मेल वृत्तपत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे सारा पीटरसोक असे या 106 वर्षे वयाच्या महिलेचे नाव असून ती मेलवाकी परिसरात राहते वयाच्या या अवस्थेतही साराला दैनंदिन आनंद घेणे आवडते याच माध्यमातून ती अनेक वेळा शहरातील कॅसिनो मध्ये जाऊन स्वतःचे नशीब आजमावत असते.
गेल्या आठवड्यात एका कॅसिनोमध्ये तिने पैसे लावले असता तिला जॅकपॉट लागला आणि मोठी रक्कम हाताशी आली दरवर्षी आपल्या वाढदिवसादिवशी कॅसिनोमध्ये जाऊन जुगार खेळणाऱ्या साराला यावर्षी जुगारामध्ये तब्बल 1000 डॉलरचा जॅकपॉट लागला तिला वाढदिवसादिवशीच जॅकपॉट लागल्याने संबंधित कॅसिनो ने आपल्या आणखी 1000 डॉलर साराला बक्षीस दिले त्यामुळे आता साराच्या अकाउंट मध्ये 2000 डॉलर जमा झाले आहेत वयाच्या या अवस्थेत कोणत्याही गोष्टीची गरज नसताना एवढी मोठी रक्कम कशी खर्च करायची असाच प्रश्न साराला पडला आहे आपल्या नातेवाईकांशी चर्चा करून या रकमेचा विनियोग करीन असे आता साराने म्हटले आहे.