सुपरओव्हरच्या जागी आता गोल्डनबॉल

दुबई – जागतिक क्रिकेटमध्ये आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सामना निकाली काढण्यासाठी सुपरओव्हरचा नियम लावला जातो. मात्र, आयसीसीच्या याच नियमाला फाटा देत युरोपातील एका स्पर्धेत गोल्डनबॉलच्या नियमाचा प्रयोग करण्यात आला. आता हाच नियम येत्या काळात जागतिक क्रिकेटमध्येही आला तर त्याला सर्व सदस्य देश पाठिंबा देतील, असा हा सुटसुटीत नियम आहे.

युरोपमधील एका टी-20 क्रिकेटच्या स्थानिक स्पर्धेत हा नियम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला व त्याचे खेळाडूंसह क्रिकेटप्रेमींनी स्वागतच केले. युरोपियन क्रिकेट सिरीजमध्ये एका संघाने 10 षटकांत 90 धावा केल्या.

दुसऱ्या संघाच्याही 10 षटकात तितक्‍याच धावा झाल्यावर सामना निकाली काढण्यासाठी गोल्डनबॉलचा नियम वापरला गेला व त्यात एका संघाला विजेता घोषित करण्यात आले. या घटनेचा वृत्तांत सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे.

गोल्डनबॉलचा नियम..

1)सामन्यात बरोबरी झाल्यावर एक जादा चेंडू टाकला जातो.
2)या चेंडूवर फलंदाजाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त धावा काढण्याचे बंधन असते.
3)मूळ सामन्यात नाबाद राहिलेला फलंदाज पुन्हा फलंदाजी करू शकतो.
4)गोल्डनबॉलच्या नियमातही बरोबरी झाली तर मात्र, साखळी सामन्यांतील सर्वाधिक विजयानुसार विजेता घोषित केला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.