चंदीगढ – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आज सुवर्ण आणि कांस्य अशी दोन पदकं मिळाली आहे. खेळाडूंच्या शानदार कामगिरीने संपूर्ण भारतात आज आनंदाचे वातावरण आहे. भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा याने सुवर्ण तर बजरंग पुनियाने कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. हरियाणा सरकारकडून नीरजला चोप्राला 6 कोटी रुपये आणि वर्ग एक श्रेणीची नोकरी तर बजरंग पुनियाला 2.5 कोटी रुपये आणि सरकारी नोकरीची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ही घोषणा केली.
Neeraj Chopra will be given Rs 6 crore & a class I category job as per our policy. We will be building a Centre of Excellence for athletes in Panchkula, where he will be the head if he wants. He will be given a plot with 50% concession, like other players: Haryana CM ML Khattar pic.twitter.com/ZubViQdSQ1
— ANI (@ANI) August 7, 2021
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत नीरजने अंतिम फेरीत पहिला थ्रो 87.03 आणि दुसरा थ्रो 87.58 मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तीत सुवर्णपदक मिळवणारा नीरज दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी नेमबाजीत 10 मीटर एअप रायपल प्रकारात 2008 मध्ये अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक पटकावले होते. भालाफेक प्रकारात पदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
As per our policy, Haryana Govt will give Rs 2.5 crores, a govt job, & a plot of land at 50% concession to wrestler Bajrang Punia for winning bronze medal at #Tokyo2020. An indoor stadium will be constructed in his native village Khudan in Jhajjar: Haryana CM Manohar Lal Khattar https://t.co/HWPXaVNGl7 pic.twitter.com/iUSudZVLrI
— ANI (@ANI) August 7, 2021
याआधी अ गटातील पात्रता फेरीतील कामगिरीच्या निकषावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे तो ऑटोमॅटिक क्वॉलिफिकेशन नियमांनुसार अंतिम फेरीत दाखल झाला होता. नीरजने पात्रता फेरीत तब्बल 86.65 मीटर अंतरावर भाला फेकला होता.
बजरंग पुनीयाने जबरदस्त कामगिरी करत कुस्ती या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले. 65 किलो वजन गटात बजरंग पुनियाने कझाकस्तानच्या खेळाडूचा पराभव केला. कझाकिस्तानच्या पैलवानाला चितपट करत बजरंग पुनिया याने इतिहास रचला. भारताच्या खात्यात आतापर्यंत पाच पदकं असून, पुनियामार्फत भारताला मिळालेलं हे सहावं पदक आहे. ब्रांझ पदकासाठी झालेल्या सामन्यात बजरंग पुनियाने कझाकस्तानच्या डोअलेट कोलकेस्तेवचा 8-0 अशा फरकाने पराभव केला. बजरंग पुनियाला स्वर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र उपांत्य फेरीत त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र या पराभवातून सावरत बजरंगने कांस्यपदकाच्या लढतीत शानदार कामगिरी करून देशाला पदक मिळवून दिलं.