नवी दिल्ली – सोने आणि चांदीच्या दरात कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीचे दर बरेच कमी झाले होते. मंगळवारी सोन्याचे दर वाढले तर चांदीचे तर कोसळल्याची परिस्थिती निर्माण झाली.
दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर 475 रुपयांनी वाढून 55,955 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 1,225 रुपयांनी कमी होऊन 63,825 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,833 डॉलर व चांदीचा दर 21.04 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
PM Narendra Modi : लोकप्रियतेत पुन्हा मारली बाजी; Twitter वर टॉप-10मध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश
रिलायन्स सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी सांगितले की, अमेरिकेतील व्याजदर वाढीमुळे जागतिक बाजारात संमिश्र वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता रेंगाळत आहे. असा प्रकार आणखी काही काळ चालू राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.