नवी दिल्ली – मंगळवारी सोन्याचा दर 22 रुपयांनी कमी होऊन 51,415 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर मात्र 162 रुपयांनी वाढून 68,137 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतीक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,928 डॉलर प्रति औंस होता.
तयार चांदीचा दर जागतिक बाजारात 25.18 डॉलर प्रति औंस होता. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे जागतिक बाजारांमध्ये सोन्याचे दर कमी झाले.
त्याचा परिणाम भारतीय बाजारातही झाला आणि सोन्याचे दर कमी झाले असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. अमेरिकेचे व्याजदर वाढीचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे आता सोन्याचे दर विशिष्ट पातळीवर स्थिर हातील असे त्यांना वाटते.