नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात 256 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 46,580 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याचे दर वाढले असल्याचे दिसून आले.दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 188 रुपयांनी वाढून 62,328 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,782 डॉलर व चांदीचा दर 23.72 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. यासंबंधात एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि अमेरिकन कर्ज रोख्यावरील परतावा कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली.