Gold-Silver Rate Today| सोने-चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. उद्या अर्थात मंगळवारी ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. यानिमित्त अनेकजण सोने – चांदी करण्यास प्राधान्य देतात. अशाच गुडीपाडवाच्या एक दिवस आधीच सोने – चांदीच्या वाढ झाली आहे.
सोन्याच्या किंमतीने ७० हजारांचा आकडा पार केला आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,०५० इतकी झाली आहे. तर चांदी ८२,०५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८१,१४० रुपये प्रतिकिलो होती. Gold-Silver Rate Today|
स्पॉट मार्केट बरोबरच वायदे बाजारातही सोन्याचे दर वाढत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात सोन्याचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात सोन्याच्या भावात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढे जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याच्या किंमती Gold-Silver Rate Today|
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,०१० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७०,९२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,०१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,९२० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर ६५,०१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,९२० रुपये इतका आहे.
नाशिक
२२कॅरेट सोन्याचा दर ६५,०१० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७०,९२० रुपये आहे.
हेही वाचा:
सोनाली कुलकर्णीची नथीमुळे झाली पंचायत; नेटकरी म्हणाले “नाकापेक्षा नथ जड”