नवी दिल्ली – जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. त्यामुळे सोन्यातील बरीच गुंतवणूक शेअर बाजाराकडे वळत असल्याचे वातावरण दिसत आहे. मंगळवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरामध्ये बरीच घसरण नोंदणी केली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 764 रुपयांनी कमी होऊन 52,347 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,592 रुपयांनी कमी होऊन 58,277 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता.
एसटीएफसी सेक्युरिटीज ज्या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारामध्ये औद्योगिक आघाडीवर घडामोडी वाढल्या आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीतील गुंतवणूक कमी होत आहे. जागतिक वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत.
त्यामुळे त्या प्रमाणात भारतीय स्पॉट मार्केटमध्ये सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. मात्र जागतिक परिस्थिती अजूनही लवचिक आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक काही प्रमाणात तरी कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान आगामी काळामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सण येत आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता आहे. मात्र भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढवून ठेवले आहे. त्यामुळे या सोने खरेदीला मर्यादा कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
….