नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय सराफात मंगळवारी सोन्याचा दर 179 रुपयांनी कमी होऊन 52,358 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेला. दिल्ली सराफात तयार चांदीचा दरही 317 रुपयांनी कमी होऊन 67,807 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर मात्र वाढून 1,954 डॉलर व चांदीचा दर 25.07 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. युद्धामुळे आणि अमेरिकेच्या व्याजदरवाढीमुळे सोन्याचा दर काही प्रमाणात वाढत राहण्याची शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी व्यक्त केली.