नवी दिल्ली – रुपयाच्या मूल्यात वाढ होऊनही जागतिक संकेतामुळे मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात भरीव वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 170 रुपयांनी वाढून 46,544 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
चांदीचा दर 172 रुपयांनी वाढून 61,584 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. रुपयाचे मूल्य नऊ पैशांनी वाढले. त्यामुळे सोन्याची आयात स्वस्त होऊनही सोन्याच्या दरात मात्र वाढ झाली.
जागतीक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1801 डॉलर व चांदीचा दर 23.18 डॉलर प्रतीक औंस या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की जागतिक बाजारातील संकेतांनुसार वायदा बाजार आता स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आले.