नवी दिल्ली -जागतिक बाजारातील संकेतानुसार भारतीय बाजारांमध्ये सोन्याच्या दरात घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 265 रुपयांनी कमी होऊन 46,149 रुपये प्रतिदहा ग्रॅम झाला.
त्याचबरोबर तयार चांदीचा दर 323 रुपयांनी कमी होऊन 61,653 रुपये प्रतिकिलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1785 डॉलर,
तर चांदीचा दर 23.65 डॉलर प्रतिऔंस या पातळीवर गेला. डॉलरचा भाव वधारत असल्यामुळे सोन्याचे दर जागतिक बाजारात कमी झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.