नवी दिल्ली -जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर भारतीय बाजारातही त्या प्रमाणात सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफीत सोन्याचा दर 237 रुपयांनी वाढून 47 हजार 994 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 153 रुपयांनी वाढून 71 हजार 421 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,874 डॉलर तर चांदीचा दर वाढून 27.80 डॉलर प्रति औंस झाला. यासंदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की,
विविध देशांमध्ये करोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जागतिक आर्थिक परिस्थिती लवचिक आहे. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार सोन्याचा आधार घेत आहेत.