पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरात करोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे आजची महासभा सभागृहात मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत घेतली असती तरी चालले असते.
एप्रिल महिन्याची विशेष सभा 30 एप्रिल रोजी घेतली तेव्हा करोना रुग्णांची संख्या जास्त होती. तेव्हा मात्र महासभा महापालिका सभागृहात घेतली गेली. परंतु आज करोना रुग्णांची संख्या कमी असताना सुध्दा ऑनलाइन सभा का घेण्यात आली असा प्रश्न विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी उपस्थित केला आहे.
त्याच प्रमाणे कॉग्रेस पक्षाचे खासदार राजीव सातव, माजी नगरसेविका चारुशिला कुटे, भाजपचे निष्ठावान जेष्ठ कार्यकर्ते प्रमोद निसळ यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळात महाराष्ट्रातील नागरीक मृत्यूमुखी पडलेले आहेत. मुंबई समुद्रात सुध्दा सुमारे 46 कामगारांचा बुडून मृत्यू झालेला आहे. त्या सर्वांना श्रद्धांजली वाहून सदरची महापालिका सभा तहकूब ठेवून नंतर घेण्यात यावी अशी मागणी मिसाळ यांनी केली आहे.