‘फोनपे’ वर सोने खरेदीची सुविधा

पुणे – फोन पे, या भारताच्या दिवसेंदिवस जलदगतीने वाढणाऱ्या व लोकप्रिय होत असलेल्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मने आज अक्षय्यतृतीयाच्या शुभमुहुर्तावर सोन्याच्या खरेदीवर आकर्षक ऑफर्सच्या मालिकांची घोषणा केली. फोन पे ने दोन वर्षांपूर्वी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन सोन्याच्या खरेदीचा विभाग सुरू केला, ज्याद्वारे ग्राहकांना घरबसल्या 24 कॅरेटचे सोने खरेदी वाजवी आणि पारदर्शक दरामध्ये, शुद्धतेच्या खात्रीसोबत प्राप्त करता येते.

सोन्याच्या खरेदीवरील या सर्व विशेष ऑफर्स फोन पे ग्राहकांसाठी उपलब्ध होतील आणि यात भाग्यशाली ग्राहकांना सोन्याच्या खरेदीवर आकर्षक बक्षिसे जसे मोफत सोन्याची चेन आणि सोन्याची नाणी, 5000 पर्यंत कॅश बॅक आणि सोन्याच्या वितरणावर मोठी सूट इत्यादींचा समावेश आहे. ग्राहक सोन्याचे वितरण थेट घरपोच, टॅंपरप्रूफ पॅकेजिंगमधे प्राप्त करू शकतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.