नवी दिल्ली -आयकर विवरण फाईल करणाऱ्य़ांची संख्या एक टक्क्याने घटली आहे. नोटाबंदीनंतर विवरण फाईल करणारे वाढतील असा समज होता. मात्र ही संख्या घटल्याचे कोटक इकोनॉमिकल रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांची आकडेवारी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील आकडेवारीपेक्षा 1 टक्क्याने कमी झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत रिटर्न फाइल करणाऱ्य़ांची संख्या 6 कोटी 74 लाख एवढी होती. मात्र या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत ही संख्या 6 कोटी 68 लाख इतकीच आहे.