नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा दर 41 रुपयांनी वाढून 47,217 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर मात्र 667 रुपयांनी कोसळून 61,337 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर सध्या 1,794 डॉलर व चांदीचा दर 22.94 डॉलर प्रति औंस आहे.
जगातील विविध बाजारावर सध्या करोनाच्या नव्या अवताराचे सावट असल्यामुळे अस्थिरतेचे वातावरण आहे असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.