नवी दिल्ली – सध्या सोन्याचे दर कमी पातळीवर असल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांकडून खरेदी होत असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे.
आजही सोने आणि चांदीच्या दरात माफक प्रमाणात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा भाव 222 रुपयांनी वाढून 45,586 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 100 रुपयांनी वाढून 61,045 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत असल्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याचे दर वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढवून 1,757 डॉलर व चांदीचा दर 23.30 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.