पुणे- करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात 1 लाख 87 हजार 644 इतके ऍक्टिव्ह रुग्ण असण्याची शक्यता आहे. यामध्ये गृह विलनीकरणामधील रुग्णसंख्या 1 लाख 21 हजार 639 असेल. तर, रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणाऱ्यांची संख्या सुमारे 65 हजार 675 इतकी असण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर बेड उपलब्धता, मनुष्यबळ, औषधे आणि इतर साधन यांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
संभाव्य तिसऱ्या लाटेमधील अपेक्षित क्रियाशील रुग्णांची संख्या निश्चित करणे, अपेक्षित रुग्णसंख्येवर आधारीत आयसीयू, व्हेंटिलेटर बेड आणि सर्वसाधारण बेडची संख्या किती लागणार याची तयारी करणे. ऑक्सिजन पुरवठा व साठवणूक याचे नियोजन करणे आदी सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.
रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणाऱ्या रुग्णांपैकी यातील 32 हजार 837 रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. यामध्ये 2 हजार
सुपर स्प्रेडर मोहीम, सर्वेक्षण सुरूच
मागील पंधरा दिवसांत पुणे महापालिका कार्यक्षेत्रात एकूण 14 हजार 180 जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 5 हजार 532 संशयित सापडले. त्यांची नमुने तपासणी केली असता, 186 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पिंपरी-चिंचवडमध्ये 8 हजार 776 जणांच्या सर्वेक्षणातून 6 हजार 373 जणांची तपासणी केली. त्यामध्ये 311 बाधित सापडले. तर ग्रामीण भागात 23 हजार 625 जणांच्या सर्वेक्षणात 15 हजार 323 जण संशयित सापडले. त्यांची नमुने तपासणी केली असता, 816 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरात सुपर स्प्रेडर सर्वेक्षणातून 3.3 टक्के तर पिंपरी-चिंचवडमध्ये 4.8 टक्के बाधित सापडले तर ग्रामीणमध्ये हे प्रमाण 5.3 टक्के इतके आहे.