नवी दिल्ली -जागतिक संकेतानुसार भारतीय बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली. डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली सराफात सोन्याचा दर केवळ सात रुपयांनी वाढून 46,223 रुपये प्रतिदहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 377 रुपयांनी वाढून 60,864 रुपये प्रतिकिलो झाला. रुपयाच्या मूल्यांमध्ये आज तेरा पैशांची वाढ झाली. त्याचाही परिणाम सोन्या-चांदीच्या व्यवहारावर झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढवून 1785 डॉलर तर चांदीचा दर 23.26 डॉलर प्रतिऔंस या पातळीवर गेला. सध्या जागतिक आर्थिक परिस्थिती अस्थिर आहे, त्यामुळे सोने आणि चांदीचे दर अस्थिर असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजच्या संस्थेचे तपण पटेल यांनी सांगितले.