नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात गुरूवारी सोन्याचा दर 6 रुपयांनी कमी होऊन 47,156 रुपये प्रत्येक दहा ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीच्या दरात 158 रुपयांची घट होऊन चांदीचा दर 60,230 रुपये प्रति किलो झाला. या घटनाक्रमाला बाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सध्या जागतिक बाजारात डॉलरसह इतर बाजारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे.
करोनाविषयक परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर विविध बाजारात स्थिरता येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात मात्र या काळात लग्नसराई असल्यामुळे सोन्याच्या खरेदीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता विश्लेषकांना वाटते. सध्या सोन्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी भारतात सोन्याची खरेदी होणार आहे.