कराड – येथील दत्त चौकामध्ये अतुल भोसले यांच्या रॅलीत झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी एकाची सोनसाखळी लंपास केली. ही घटना आज गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. महेश प्रल्हाद काटकर रा. खोडशी ता. कराड यांची दीड तोळ्याची सोन्याची चैन चोरीस गेली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आज गुरुवारी कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर सभास्थळी जाण्यासाठी मोठी रॅली काढण्यात आली होती. तेव्हा ही रॅली दत्त चौकातून थोडी पुढे आले असता, गर्दीचा फायदा घेत महेश काटकर यांची दीड तोळा वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेऊन गर्दीत पोबारा केला. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून पोलीस नाईक पाटील पुढील तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी आ. बाळासाहेब पाटील यांच्या रॅलीतही दोन सोनसाखळ्या चोरीस गेल्या होत्या. गर्दीचा फायदा हे चोरटे घेत असल्याचे समोर आले आहे. यांचा पोलिसांनी योग्य बंदोबस्त करण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.