नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कमी होत असल्यामुळे त्या प्रमाणात भारतीय बाजारात सोने व चांदीचे दर कमी झाले असल्याचे दिसून आले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 388 रुपयांनी कमी होऊन 47,917 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेला. तर चांदीचा दर 920 रुपयांनी कमी होऊन 69,369 रुपये किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,870 डॉलर तर चांदीचा घर 27.35 डॉलर या पातळीवर गेला. सोन्याचे दर सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार नफा काढून घेत आहेत.
त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले