‘या’ तारखेपासून मिळणार सुवर्ण रोखे 

नवी दिल्ली – वर्ष 2021-22 शृंखलेतील पहिले रोखे 17 मेपासून उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना या रोख्याची खरेदी 17 मेपासून पाच दिवस करता येईल.

संपूर्ण वर्षामध्ये सहा वेळा हे रोखे उपलब्ध करण्यात येणार आहेत. आतो रोखे ग्राहकांना 17 ते 21 मे दरम्यान खरेदी करता येतील आणि हे राखे 25 मे रोजी ग्राहकांच्या खात्यात जमा होतील.
हे राखे बॅंका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, पोस्टाची कार्यालये, आणि शेअर बाजारात उपलब्ध होणार आहेत.

केंद्र सरकारच्या वतीने रिझर्व्ह बॅंक हे रोखे जारी करणार आहे. रोख्यातील सोन्याची किंमत लवकरच जाहीर करणार आहे. डिजिटल माध्यमातून रोखे खरेदी करणारे आणि पेमेंट करणाऱ्यांना प्रतिग्रॅमला 50 रुपयांची सूट उपलब्ध होत असते. हे रोखे एक ग्रॅमच्या टप्प्यात उपलब्ध होतील.

प्रत्यक्ष सोने खरेदी करण्यासाठी जी केवायसी लागते तीच केवायसी सुवर्ण रोख्यासाठी लागू असणार आहे. सप्टेंबर 2015 पासून केंद्र सरकारने हे रोखे उपलब्ध केले आहेत. नागरिकांनी प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी रोख्याच्या माध्यमातून खरेदी करावी हा सरकारचा उद्देश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.