मुंबई – गुप्ता ब्रदर्स; चार कुंवारे फ्रॉम गंगा किनारे मधून पदार्पण केलेल्या परिणिता बोरठाकूरला आता टीव्हीवरील रियालिटी शोमधून सहभागी व्हायचे आहे. काल्पनिक कथांच्या मालिकांमधून काम केल्यानंतर आता प्रेक्षकांसमोर स्वतःची छबी ठसवण्याचा तिचा विचार आहे.
त्यासाठी काही आव्हानात्मक करण्याचीही तिची तयारी आहे. म्हणूनच रियालिटी शोमध्ये तिला सहभागी व्हायचे आहे. “बिग बॉस’ संपेपर्यंत तिला तशी संधी मात्र मिळणार नाही. त्याशिवाय गायन किंवा डान्सच्या कार्यक्रमातून सहभागी होण्याचीही तिची तयारी आहे. याशिवाय तिला “खतरों के खिलाडी’सारख्या ऍडवेंचर गेम्समध्येही सहभागी व्हायला आवडेल.
“बिग बॉस’मध्ये फार काळ टिकाव धरू न शकणे पुढे अवघड आहे. तिथल्या अहंकारी, भांडाभांडी आणि ब्लेमगेमला आपला स्वभाव अनुकूल नाही, हे तिला माहीत आहे. यापूर्वी परिणिताने “एक था राजा एक थी रानी’, “प्रीतम प्यारे और वो’ आणि “स्वरागिणी’ आदी मालिकांमधून काम केले आहे.