नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे बुधवारी सोन्याचा दर 228 रुपयांनी वाढून 46,812 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 271 रुपयांनी वाढून 59,932 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,818 डॉलर व चांदीचा दर 22.70 डॉलर प्रती औंस या पातळीवर होता.
अमेरिकेत व्याजदरात वाढ होणार असल्यामुळे डॉलर कमकुवत होत आहे. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढून सोन्याचे दर वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. सोन्याचे दर सध्या जास्त असले तरी लग्नासाठी भारतात सोन्याची खरेदी वाढत असल्याचे व्यापारी म्हणाले.