पुणे – अजिंक्य क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर 12 वर्षांखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत चंद्रोस क्रिकेट अकादमीने सेकंद क्रिकेट अकादमीचा 7 गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
या स्पर्धेत साखळी फेरीत सेकंड क्रिकेट अकादमीचा डाव 20 षटकांत 9 बाद 62 धावांवर संपला. हे आव्हान चंद्रोस क्रिकेट अकादमीने 9.2 षटकांत 3 बाद 63 धावा करून पूर्ण केले.