नवी दिल्ली : गोकुलम केरळ एफसी संघाने इंडियन वुमेन लीग फुटबाॅल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कांगचुप रोड यंग फिजिकल एंड स्पोर्टस असोसिएशन (केआरवायपीएचएसए) एफसी संघाचा ३-२ ने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
FT: Congratulations, @GokulamKeralaFC 🎉🎇🙌🏻
KRY 2⃣-3⃣ GKL#HeroIWL 🏆 #IndianFootball ⚽ #ShePower 👧🏻 #KRYGKL ⚔ pic.twitter.com/Zo4j7HZxXZ
— Indian Football Team (@IndianFootball) February 14, 2020
गोकुलम केरळ संघाकडून प्रमेश्वरी देवीने पहिल्या मिनिटाला तर कमला देवीने २५ व्या मिनिटाला गोल करत संघास २-० ने आघाडीवर नेले होते. पण त्यानंतर मध्यांतरापूर्वी ‘केआरवायपीएचएसए’च्सा दांगमेई ग्रासे हिने ३४ मिनिटाला पहिला गोल करत ही आघाडी कमी केली.
87' Cometh the hour, cometh the girl 💯
Sabitra 'Samba' Bhandari hits the roof of the net 🎯
KRY 2⃣-3⃣ GKL#HeroIWL 🏆 #IndianFootball ⚽ #ShePower 👧🏻 #KRYGKL ⚔ pic.twitter.com/oZh7nPFRBe
— Indian Football Team (@IndianFootball) February 14, 2020
त्यानंतर दुस-या सत्रात ‘केआरवायपीएचएसए’च्या रतनबाला देवीने ७३ व्या मिनिटाला गोल करत संघास २-२ ने बरोबरी साधून दिली. पण, गोकुलम केरळच्या सबित्रा भंडारीने ८७ व्या मिनिटाला गोल करत संघास ३-२ ने आघाडीवर नेले. ही आघाडी सामन्याच्या अखेरपर्यंत कायम राहिली आणि गोकुलम केरळने सामन्यासह स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.