साडेसात लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त

कोल्हापूर/ प्रतिनिधी – जिल्ह्यातील चौकुळ- इसापूर-हेरे मार्गावर सुमारे साडेसात लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारू सह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विश्वनाथ आनंदा रायकर (वय ३०) व संभाजी शिवाजी साबळे (वय ३०) अशी या दोघांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी रायकर व साबळे यांना चंदगड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडीत सुनावली.

जिल्हा अधीक्षक गणेश पाटील व उपअधिक्षक बापू चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संभाजी बरगे, जग्गनाथ पाटील, किशोर नडे, जवान संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे, रंजना पिसे यांनी ही कारवाई केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)