येत्या स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारचा मिशन मंगल रिलीज होणार असून याच दिवशी जॉन अब्राहमचा बाटला हाऊस देखील रिलीज होत आहे. दरम्यान, आपल्या चित्रपटाची टक्कर टाळण्यासाठी अभिनेता प्रभासने आपल्या ‘साहो’ या चित्रपटाच्या रिलीजची तारीख पुढे ढकली आहे. आता ‘साहो’ 15 ऑगस्टऐवजी ’30 ऑगस्ट’ला रिलीज होणार आहे.
Prabhas and Shraddha Kapoor… New poster of #Saaho… Costars Neil Nitin Mukesh… Directed by Sujeeth… 30 Aug 2019 release. #30thAugWithSaaho pic.twitter.com/iVJao8eN1D
— taran adarsh (@taran_adarsh) July 23, 2019
‘साहो’ चित्रपट हिंदीबरोबरच तमिळ आणि तेलगूमध्येही रिलीज केला जाणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.