शुभमनला कसोटीत संधी द्या – हरभजन

नवी दिल्ली : भारतीय संघाने न्यूझीलंडला टी-20 सामन्यांच्या मालिकेत 5-0 असे पराभूत केले. मात्र, त्यानंतर झालेली एकदिवसीय सामन्यांची मालिका न्यूझीलंडने जिंकली आता होणाऱ्या कसोटी मालिकेत भारताला भक्कम सलामी मिळावी असे वाटत असेल तर नवोदित शुभमन गिल याला संघात स्थान द्यायला हवे, असे मत भारताचा ऑफस्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले आहे.

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघात रोहित शर्मा दुखापतीने बाहेर आहे. त्यामुळे मयांक आग्रवालसह सलामीला कोण फलंदाजी करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.