दहा वर्षांचा अलौकिक फुटबॉलपटू

तिरुवनंतपूरम : भारतीय फुटबॉल क्षेत्राला आता कुठे लोकप्रियता मिळू लागली आहे. या खेळाचा प्रसार तळागाळापर्यंत होत असून देशातील विविध शहरांतीलच नव्हे तर खेडोपाड्यातील खेळाडू देखील अफलातून कामगिरी करत आहेत. यातच एक नाव सध्या चर्चिले जात आहे.

हा केवळ 10 वर्षांचा फुटबॉलपटू आहे दानी पिके. केरला किड्‌स फुटबॉल स्पर्धेत त्याने मारलेल्या कॉर्नर कीकमुळे सध्या त्याच्या कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला हजारोंच्या संख्येने लाईक्‍स मिळत आहेत.
या स्पर्धेतील एका सामन्यात दानीने कॉर्नर किक मारत फुटबॉल शौकिनांनाच नव्हे तर जाणकारांनाही थक्क केले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 10 वर्षीय दानीच्या खेळाची खूपच प्रशंसा झाली. या स्पर्धेत त्याने तब्बल 13 गोल केले व स्पर्धेचा मानकरी पुरस्कार पटकावला. कोझिकोडे जिल्ह्यातील एका शाळेत तो पाचव्या इयत्तेत शिकत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.