कोंढवा – लोकांच्या मनातील आणि स्वप्नातील विकासाची कामे करा. लोकाभिमुख कामांना प्राधान्य द्या, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
प्रभाग क्र.27 कोंढवा खुर्द येथील नगरसेवक ऍड. हाजी गफुर पठाण यांनी प्रकाशित केलेल्या राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे प्रकाशन विभागीय आयुक्त कार्यालयात पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, नगरसेविका नंदा लोणकर, नारायण लोणकर, अनिस सुंडके, हाजी फिरोज शेख, रईस सुंडके, इकबाल मुलाणी, जावेद पठाण, अजीज शेख, अनवर शेख आदि यावेळी उपस्थित होते.