जमिनी परत द्या अन्यथा आत्मदहन करू

खंडकरी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण

नगर – मौजे निमगाव कोहाळे सावळविहीर निघोज येथील खंडकरी सिलिंग कायद्या अस्तीत्वात असल्यापासून खंडाच्या जमिनी सर्वच खडकऱ्यांना परत मिळण्यासाठीच्या मागणीकरिता मोर्चे व सत्याग्रहाच्या मार्गाने लढाईत अग्रेसर राहिले होते मात्र नेमका याच गावातील खडकऱ्यांना त्यांच्या जमिनी गेल्या सात वर्षात अद्याप परत न देता या खंडकऱ्यावर घोर अन्याय राज्य शासनाने केलेला आहे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यां समोर उपोषण करण्यात आले यापुढे 15 दिवसात या निमगाव कोहळ सावळविहिर निघोज या गावातील खंडकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार जमिनी परत द्याव्यात अशी राज्य शासनाकडे आग्रही मागणी केली आहे, अन्यथा आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेच्या वतीने खंडकरी शेतकऱ्यांचे हक्काच्या जमिनी परत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी भाऊसाहेब नाना कातोरे समवेत सरपंच गणेश उनगरे, अभिषेक मते, भानुदास कातोरे, राहुल कातोरे, राजाराम कातोरे, संदीप कातोरे, ज्ञानेश्‍वर कातोरे, सिताराम जावळे, सागर कातोरे, जाधव, गाडेकर आदींसह शेतकरी उपस्थित होत. राज्य शासनाने खंडकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी संदर्भात सिलिंग कायद्याचे उल्लंघन केलेअसून सिलिंग कायद्यानुसार हक्काच्या जमिनी परत मिळण्यासाठी अनेकदा निवेदने देऊन मोर्चे व सत्याग्रह करून मागण्या केल्या पण शासनाने जुमानले नाही.

अखेर खंडकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 1991 मधील अनेक याचिका दाखल करून जमिनी परत मिळण्याची मागणी केली होती.मात्र शासनाने सिलिंग कायदा राज्यघटनेचा नवव्या परिशिष्टात सामील करून फडक्‍यांना त्यांच्या जमिनी परत मिळण्याबाबत कायमचा अडथळा करून ठेवला होता. 2003 मध्ये राष्ट्रपती यांनी कायदा दुरुस्तीस मान्यता दिली .उच्च न्यायालयाने खंडकऱ्यांना खंडाच्या जमिनीचे मालक घोषित करून त्यांना कमाल मर्यादे पर्यंत त्यांच्या जमिनी परत देण्याचा राज्य शासनाला आदेश दिला.

या निकाला विरुद्ध शेती महामंडळाच्या कामगार संघटनेने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले मात्र न्यायालयाने त्यांचे अपील 2011 मध्ये फेटाळले. राज्य शासनाने रावळगाव पासून कोल्हापूर पर्यंतच्या 14 ही मळ्यातील खडकऱ्यांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी त्यांच्याच गावात परत दिल्या, मात्र लक्ष्मीवाडी माया खालील मौजे निमगाव कोहाळे सावळविहिर व निघोज येथील खडकऱ्यांना ठरवलेले क्षेत्र अद्याप परत न देता वंचित ठेवले आहे.

निमगाव कोर्हाळे येथील महामंडळाकडे 212 एकर क्षेत्र असून 190 एकर क्षेत्र खडक यांच्या मालकीची आहे मात्र आजमितीस गावातील खडकऱ्यांना फक्त 120 एकर 12 गुंठे अंतिम ध्येय ठरवले आहे ते परत मिळावे अशी खडकऱ्यांची मागणी आहे व मौजे सावळविहिर येथे महामंडळाकडे 221 क्षेत्र असून पैकी येथील खडक यांना फक्त आणि 80 एकर क्षेत्र अंतिम ध्येय ठरवले आहे ते अद्याप पर्यंत दिलेले नाहीत ही ते परत मिळावे अशी येथील खडकऱ्यांची आग्रही मागणी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here