मुंबई – काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद कोणतं पाऊल उलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. आझाद यांनी जम्मू काश्मीरचा दौरा करताना नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचा सूतोवाच केला होता. आता आझाद यांनी आपल्या नव्या पक्षाच्या नावाची घोषणा केली आहे. Democratic Azad Party असं त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आहे.
Jammu | Ghulam Nabi Azad announces the name of his new party – ‘Democratic Azad Party’
He resigned from the Congress party on August 26th. pic.twitter.com/xKKrVYMvOd
— ANI (@ANI) September 26, 2022
जम्मू काश्मीरमध्ये आझाद यांनी पत्रकार परिषदेद्वारे आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा केली. आझाद यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसमधून बाहेर पडत थेट काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होत. आता आझाद आपल्या नव्या पक्षाच्या माध्यमातून थेट काँग्रेसला टक्कर देणार आहेत. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या आझाद यांचे काँग्रेस सोडल्यानंतर काश्मीरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले होते.